युवराज छत्रपती संभाजी राजे यांचा उद्या जनसंवाद दौरा ; खांदा कॉलनी सकल मराठा समाजाचे आयोजन....
युवराज छत्रपती संभाजी राजे यांचा उद्या जनसंवाद दौरा ; खांदा कॉलनी सकल मराठा समाजाचे आयोजन....
पनवेल वैभव / प्रतिनिधी : - सकल मराठा समाज खांदा कॉलनी आयोजित, युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या २६/१०/२०२१ रोजी होणाऱ्या जनसंवाद दौऱ्यासाठी छत्रपती खांदा कॉलनी मध्ये सायंकाळी ५.०० वा येत आहेत, या नंतर ते पनवेल येथे फडके नाट्यगृहात त्यांच्या दौऱ्याची बैठक घेऊन जनसंवाद दौऱ्याची सांगता होईल. 
त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनसाठी सकल मराठा समाज खांदा कॉलनीची नियोजन - आढावा बैठक आज खांदा कॉलनी येथील श्री शंकर मंदीर येथे संपन्न झाली, खांदा कॉलनीतील मराठा समाजासह परिवार मोठ्या संख्येने या दौऱ्यात सहभागी होणार असा निश्चय या प्रसंगी करण्यात आला, एक मराठा, लाख मराठा..
Comments