पनवेल तालुका पोलिसांची बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडरचा व्यवसाय करणार्‍यांवर कारवाई...
पनवेल, दि.29 (वार्ताहर) ः तालुक्यातील पोयंजे गावाच्या हद्दीत असलेल्या एका धाब्याच्या परिसरात बेकायदेशीररित्या टँकरद्वारे गॅस काढून तो सिलेंडरमध्ये भरुन त्याची विक्री करणार्‍या चार जणांविरुद्ध पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई करून गॅस टँकर, मोटार सायकल, महिंद्रा कंपनीचा बोलरो या मिळून जवळपास 39 लाख 14 हजार 875 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तालुक्यातील पोयंजे गावाच्या हद्दीतील मनोज ढाब्याच्या परिसरात अशा प्रकारे गॅस टँकर उभे करून त्याद्वारे गॅस काढून तो इतर सिलेंडरमध्ये बेकायदेशीररित्या भरला जात असल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून त्या ठिकाणी असलेले सोमराज विष्णोई (23), मांगीलाल विष्णोई (19), सुभाष पुनिया (24) व जलालउद्दीन अलीमउद्दीन खान (29) या चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून टँकर नं.एमएच-12-एलडी-5333, महिंद्रा बोलेरो जीप, हिरो कंपनीची मोटार सायकल, जुगाड मशिन, रेग्युलेटर व इतर साहित्य असा मिळून जवळपास 39 लाख 14 हजार 875 रुपये मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध भादवी कलम 406, 285, 34 सह जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 4, 7, 8 सह रेग्युलेशन ऑफ सप्लायर्स अ‍ॅण्ड डिस्टीब्युशन ऑर्डर 2000 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. या घटनेत अजूनही काही जणांचा समावेश असल्याने त्यांचा शोध तालुका पोलीस करीत आहेत.
Comments
Popular posts
नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ...
Image
पनवेलमध्ये सौर प्रकल्प निर्मिती व आधुनिक महिला सुविधा केंद्र उभारा - ममता प्रितम म्हात्रे
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image