वृद्ध इसमाच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून दोघे जण पसार...
वृद्ध इसमाच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून दोघे जण पसार...

पनवेल दि. ०३ (संजय कदम)- : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या एका वृद्ध इसमाच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून मोटारसायकलीवरील दोघेजण पसार झाल्याची घटना कामोठे वसाहतीत घडली आहे.
         प्रकाश वाघ (वय-61) हे मॉर्निंग वॉकला जात असताना भूमी टॉवरसमोर से.-36 कामोठे येथे अचानकपणे मोटारसायकलीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील 90 हजारांची 3 तोळ्यांची सोन्याची चेन खेचून ते पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार कामोठे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments