खारघरमध्ये रेती उपसा करणार्‍यांवर कारवाई...
खारघरमध्ये रेती उपसा करणार्‍यांवर कारवाई...

पनवेल / (वार्ताहर)  : -  खारघर परिसरातील कोपरा खाडीमध्ये असलेल्या रेल्वे पुलाजवळ सुरु असलेल्या अनधिकृत रेती उत्खननावर महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व खारघर पोलिसांनी सयुक्तिक कारवाई केली. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात रेती साठा करून रेती चोरी करण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारघर कोपरा येथील खाडीमध्ये रेल्वे पुलाजवळच अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याबाबतची माहिती पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांना मिळाली होती. यावेळी तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोलीचे मंडळ अधिकारी संतोष  कचरे, मंडळ अधिकारी मोरबे एल राउळ,  मंडळ अधिकारी कर्नाळा मनीश जोशी, तलाठी खारघर अंकीता लोखंडे, तलाठी कळंबोली संजय बिक्कड या पथकाने खारघर पोलिसांच्या सहकार्याने कोपरा खाडी रेल्वे पुलाजवळ धाड टाकली. यावेळी काही अज्ञात इसमांनी रेती अनधिकृतपणे सेक्शन पंपाच्या साहाय्याने करून तीन कोंड्यात रेती आढळून आली. सदर पथकातील अधिकार्‍यांनी जेसीबीच्या मदतीने कोंड्या उद्ध्वस्त केल्या तसेच कटरच्या साहाय्याने सेक्शन पंपचे तुकडे करून खाडीत सोडण्यात आले. यावेळी खारघर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरोधात रेती चोरीचा प्रयत्न केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Popular posts
एकता मित्र मंडळ लाईन आळी तर्फे होलिकोत्सव व संत तुकाराम महाराज बीज निमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवक मनोज भुजबळ यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट..
Image
गोदरेज प्रॉपर्टीजचा एक लाख घरांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण ; कुटुंबाला मोफत घराची अनोखी भेट..
Image