गावठी दारुची वाहतूक करणार्‍यास पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात....
गावठी दारुची वाहतूक करणार्‍यास पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात....

पनवेल, दि.29 (संजय कदम) ः गावठी दारुची वाहतूक शेवरलेट या चार चाकी वाहनातून करणार्‍या एका इसमास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून गावठी दारुसह गाडी असा मिळून 2,08,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सागर कोटकर (30 रा.शिळ रोड) हा करंजाडे सेक्टर 1 या ठिकाणावरुन त्याच्या ताब्यात असलेली काळ्या रंगाच्या शेरवलेट गाडीतून गावठी दारु घेवून जात असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळताच सपोनि गणेश दळवी, निशांत धनवडे, पो.हवा.संजय केरुर, पो.शि.सोनवणे आदींच्या पथकाने सापळा रचून सदर गाडी अडवून तपासणी केली असता त्या गाडीमध्ये पांढर्‍या रंगाच्या गोणीमध्ये प्लॅस्टीकच्या पिशवीत 80 लीटर गावठी दारु आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारु बंदी कायदा कलम 65 (अ) (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image