पनवेल । वार्ताहर
पनवेलच्या लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये मूतखड्याच्या उपचारावर अत्याधुनिक-प्रगत तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध झाली आहे. मुतखडा या आजारावर थुलिअम 60 व्हॅट लेझर या मशिनद्वारे विना शस्त्रक्रिया उपचार केले जात आहेत. मुंबईनंतर प्रथमच अशा प्रकारचे लेझर मशिन हे नवी मुुंबई, रायगड, कोकणमध्ये प्रथमच लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये आणले आहे. गेल्या 3 महिन्यात 50 पेक्षा जास्त रूग्णांवर उपचार केले गेले आहेत.
लाईफ लाईन हॉस्पिटलचे हे 25 वे वर्षे आहे. मुतखडा उपचाराच्या अत्यावश्यक सेवेसाठी 24 तास उपलब्ध असणारेे हॉस्पिटलचे डॉ. अजिंक्य प्रकाश पाटील हे पहिलेच स्थानिक युरोलॉजिस्ट आहेत. थुलिअम लेझर या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, या लेझरचे वैशिष्ट्य म्हणजे या लेझरने किडनी स्टोन व प्रोस्टेट यांचे विना शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे उपचार होतात व किडनीमध्ये स्टोन असेल तर तो थुलियम लेझरच्या सहाय्याने फोडता येतो व त्यामुळे पारंपारिक पीसीएनएल म्हणजेच किडनीला छिद्र पाडून त्याच्यातून दुर्बिण टाकून खडा फोडण्याचं जी शस्त्रक्रिया केली जाते ते आपण टाळू शकतो व किडनीला छिद्र न करता मूत्र मार्गाद्वारे दुर्बिण टाकून त्याच्यातून फायबर लेझरच्याद्वारे किडनी स्टोन फोडता येतो व त्या मुतखड्याचा चुरा होऊन त्याची पावडर करून बाहेर काढली जाते. त्यामुळे शस्त्रक्रियेमध्ये जे किडनीला छिद्र पाडले जाते, ते आपण टाळू शकतो. शिवाय यामध्ये किडनीला छिद्र न केल्यामुळे रक्तस्राव होत नाही तसेच टाके लागत नाहीत, हे विशेष आहे व पेशंटला वेदना न होता हॉस्पिटलमधून 24 तासात घरी डिस्चार्ज करता येते.
किडनीमध्ये नळी ठेवण्याची गरज रहात नाही एका दिवसात रूग्ण अगदी घरी जाऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये शस्त्रक्रियेचा जो त्रास असतो तो होत नाही. भूल देखील कमी वेळ द्यायला लागते. खास करून डायबीटीस आणि ब्लड प्रेशरच्या रूग्णामध्ये ही थुलियम लेसरद्वारे किडनी स्टोन फोडण्याची तसेच लेझरद्वारे प्रोस्टेट काढण्याची जी पद्धत आहे ती एक वरदान ठरते. खासकरून डायबेटिस ब्लडप्रेशरच्या रूग्णामध्ये थुलियम लेझर हे एक वरदान आहे व ते लाईफ लाईन हॉस्पिटलने पनवेलमध्ये प्रथमच आणले आहे. पनवेल तसेच रायगड, नवी मुंबई व कोकणमधील सर्व किडनी स्टोनच्या व प्रोस्टेटच्या रूग्णासाठी अत्यंत गरजेची आधुनित तंत्रज्ञानाची सुविधा पनवेलमध्ये झालेली आहे. युरोलॉजीमध्ये आणखी एक अत्यावश्यक म्हणजे मूत्र नलिकेमध्ये अडकलेला मुतखडा किडनीमध्ये तयार झाल्यानंतर तो लघवीच्या सोबत मूत्रनलिकेद्वारे मूत्राशयात सरकतांना मूत्रनलिकेत अडकतो व त्यामुळे रूग्णाला तीव्र वेदना होतात, त्याच वेळेस उलट्या होतात व रूग्ण अक्षरशः लोळतो. अशा वेळेस त्या रूग्णाला ताबडतोब दुर्बिणीने उपचार करून त्याच्या तीव्र वेदनांपासून त्याची ताबडतोब काही मिनिटात सुटका केली जाते असे त्यांनी सांगितले.
युरोलॉजीमधील खास करून पुरुषांमधील दोष यामध्ये स्ट्रीक्चर ऑफ यूरेथरा (लघवीच्या मार्गात अडथळा येणे) तसेच जन्मताच मूत्रमार्ग संकुचित किंवा न्यारो असणे शिवाय युरोलॉजीमधील कॅन्सरच्या रुग्णांना देखील याचा फायदा होऊ शकतो जसे मुत्राशयाचा ब्लड कॅन्सर तसेच पुरुषाच्या अंडकोशांचे टेस्टी कलर कॅन्सर, किडनीचा कॅन्सर अशा सर्व कॅन्सर वरील निदान, उपचार व ऑपरेशन्सही या युरॉलॉजी सेंटर्समध्ये केले जातात तसेच युरोलॉजीसाठी लागणार्या सर्व तपासण्या म्हणजे सिटीस्कॅन अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाची थर्टी टू स्लाइसचे सिटीस्कॅन (3 डी) सुविधा की ज्यामुळे कमी रेडीशन (क्ष-किरणे) शरीरावर येतात तसेच एमआरआय आहे, याद्वारे युरोलॉजीसाठी लागणार्या आधुनिक तपासण्या देखील या सेंटरमध्ये उपलब्ध आहेत, त्यामुळे युरोलॉजीचे युरोलॉजीसाठी लागणार्या सर्व तपासण्या व उपचार एकाच छताखाली केल्या जातात.
अधिक माहितीसाठी लाईफ लाईन हॉस्पिटलचे डॉ. अजिंक्य प्रकाश पाटील (मो. 8779197485) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.