गणेशोत्सवापूर्वी कळंबोली परिसरातील खराब रस्ते, बंद विजेचे दिवे आदींची तातडीने कामे करून घेण्याची शिवसेनेची सिडकोकडे मागणी
पनवेल दि. ३१ (वार्ताहर): गणेशोत्सवापूर्वी कळंबोली वसाहत परिसरातील खराब रस्ते, रस्त्यावरील बंद विजेचे दिवे आदींची तातडीने कामे करून घेण्याची शिवसेनेने सिडकोकडे मागणी केली आहे.
         रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या आदेशाने, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, विधानसभा समन्वयक प्रदीप  ठाकूर, यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना कळंबोली शहर शाखेतर्फे सिडको ऑफिस कळंबोली येथे विविध नागरी समस्यांसाठी भेट देण्यात आली. कार्यकारी अभियंता  बनकर यांचे निवेदन देऊन भेट घेतली, कळंबोळीतील मुख्य समस्यावर चर्चा करण्यात आली, मुख्यता खराब रस्ते, रस्त्यावरील विजेचे दिवे, इतर विषयांवर मार्ग लवकरात लवकर काढावे आणि कळंबोली जनतेला सर्व सुविधा चांगल्या मिळाव्यात असे निवेदन देण्यात आले. सदर वेळी शिवसेनेचे, शहर प्रमुख डी एन मिश्रा,जेष्ठ शिवसैनिक माजी ग्राहक संरक्षण कक्ष रायगड अध्यक्ष,आत्माराम कदम,शहर समन्वयक गिरीश धुमाळ, उपशहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, उपशहर प्रमुख नारायण फडतरे, उपविभाग प्रमुख तुषार निढाळकर,  विभाग प्रमुख महेश गुरव, आशुतोष शेंडगे, नागेश शेळके, विनय शिर्के, योगेश पगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सिडकोचे अधिकारी बनकर यांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर सिडकोमार्फत नागरी सुविधा चांगल्या प्रतीने उपलब्ध करून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
         


 
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image