रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रथमच महिला क्रिकेट खेळाडूंची निवड
पनवेल:  रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित रायगड च्या इतिहासात प्रथमच मुलींची  अंडर 19 मध्ये निवड करण्यात आली.  सदर सिलेक्शन हे इनामपुरी खारघर येथे संपन्न झाले या सिलेक्शन साठी रायगड जिल्ह्यातून  एकूण 34 मुली  आल्या होत्या आणि त्यातून चार मुलींची निवड करून आज महाराष्ट्र सिलेक्शन कॅम्प साठी   पाठवण्यात आले आहेत. सर्व पालकांनी आणि खेळाडुनी क्रिकेट असोसिएशनचे याबद्दल आभार मानले. यावेळी  मनीषा अडबळ आणि नीलम पाटील ह्या सिलेक्टर उपस्थित होत्या. मनीषा अडबळ यांच्या  माध्यमातून आज सिलेक्शन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते,  जिल्हा सरचिटणीस बहुतुले,  स्पर्धा कमिटीचे चेअरमन किरीट पाटील सिलेक्शन कमिटीचे चेअरमन प्रीतम कैया, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पावसकर,सुयोग चौधरी, संदीप पाटील,  सुहास हिरवे, सागर सावंत, इत्यादी पदाधिकारि उपस्थित होते.
Comments