चिपळूणच्या पूरग्रस्तांसाठी विरेंद्र उर्फ गुरू म्हाञे यांचा मदतीचा हात....

नवी मुंबई : माझी जबाबदारी, माझे कर्तव्य या सामाजिक भावनेतून लायन हार्ट group नवी मुंबई चे  अध्यक्ष  व युवा नेते विरेंद्र उर्फ  गुरू  म्हाञे यांनी कोकणातील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हात पुढे करीत जीवनावश्यक वस्तूंचे आज वाटप केला.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण परिसरात सर्वच ठिकाणाहून मदतीचा ओघ सुरु आहे. ग्रामीण भागात, खेडे गावात व शहरी भागात देखील मोठ्या प्रमाणात पावसाने मोठे नुकसान झाले आहे. आपले कर्तव्य म्हणून एक हात  मदतीचा हे धेय मनात ठेवून हि मदतकरत आसल्या चे लायन हार्ट group नवी मुंबई चे  अध्यक्ष विरेंद्र म्हाञे यांनी नवी मुंबई येथून मदत पाठविली आहे. चिपळूण येथील गरजूंना समाजसेवक विरेंद्र उर्फ  गुरू  म्हाञे, लायन हार्ट group नवी मुंबई ,स्थानिक रहिवाशी यांच्या तर्फे मदत पोचवण्यात येणार आहे. कोरोना महामारीच्या काळात प्रारंभापासून विरेंद्र उर्फ  गुरू  म्हाञे यांनी त्यांच्या निवासी प्रभागात सातत्याने जनसेवा करत आपले सक्रिय योगदान आजवर दिले आहे. अतिवृष्टीमुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या नुकसानीमुळे तेथील नुकसान झालेल्या लोकांना हातभार लावण्यासाठी विरेंद्र उर्फ  गुरू  म्हाञे यांनी पुढाकार घेतला व चिपळूण येथे  जाऊन  वाटप केले.
Comments