मेडीकल दुकानातून मोबाईलची चोरी.....
मेडीकल दुकानातून मोबाईलची चोरी.....

पनवेल, दि.७ (संजय कदम) ः मेडीकल दुकानातील आतील काऊंटरवर ठेवलेला मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
शहरातील ज्येष्ठ नागरिक हॉल जवळील वेलनेस वर्ल्ड शॉप नं.3 येथे फिर्यादी प्रदीप कदम यांची मुलगी कु.जाई हिने त्यांचा 9 हजार रुपये किंमतीचा मोटोरोला कंपनीचा मोबाईल फोन हा दुकानाच्या आतील काऊंटरवर ठेवला असता अज्ञात चोरट्याने सदर मोबाईल चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments