कंटेनर चालकाला मारहाण करून लुटले....
कंटेनर चालकाला मारहाण करून लुटले...

पनवेल, दि.१० (संजय कदम) ः एका कंटेनर चालकाला मारहाण करून लुटल्याची घटना पनवेल तालुक्यातील धानसर गावाच्या हद्दीत घडली आहे.
चंद्रवीर चौधरी (60) हे पहाटेच्या वेळी त्यांच्या ताब्यातील मोटार कंटेनर क्र.एनएल-01-एई-6537 हा घेवून धानसर गावाच्या हद्दीत उभा करून सेफ इंटरप्रायझेेस कंपनीचा पत्ता विचारण्यासाठी खाली उतरले असता दोन अज्ञात इसम त्यांच्या जवळ आले व त्यांनी आपसात संगनमत करून त्यांना जबरी मारहाण करून त्यांच्या खिशातील 500 रुपये काढून घेवून ते पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments