स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एस जी टी इंटरनॅशनल स्कुल तर्फे उत्साहात साजरा..
पनवेल / प्रतिनिधी :- दि.१५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एस जी  टी इंटरनॅशनल स्कुल कामोठे, करंजाडे, डोम्बाळा आणि पळस्पे  येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संपूर्ण कार्यक्रम सुनियोजित पद्धतीने करण्यात आला 

पनवेल  तालुक्यातील शिक्षणाची गरज लक्षात घेऊन व समाजातील सर्व थरां मध्ये शिक्षण पोहोचविण्यासाठी   सावित्रीबाई गुलाब तुपे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश गुलाब तुपे यांनी हा पुढाकार घेतला आहे विद्यार्थ्यांना सी बी एस ई आणि एस एस सी बोर्ड अशा दोन्ही पद्धतीचे विकल्प निवडता येणार आहेत 

विद्यार्थ्याना सर्वेतोपरी नव्या युगाच्या सर्व अत्याधुनिक शैक्षणिक सेवासुविधा मिळवून देण्यासाठी एस जी  टी इंटरनॅशनल स्कुल मॅनेजमेंट, प्रिन्सिपॉल आणि स्टाफ कटिबद्ध राहील कामोठे, करंजाडे, डोम्बाला आणि पळस्पे ह्या विभागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करता यावी यासाठी शाळेत अत्याधुनिक प्रयोगशाळा, उत्कृष्ट लायब्ररी, खेळाचे साहित्य, कम्प्युटर लॅब, लँगवेज लॅब, स्मार्ट कलासरूम्स, सेपरेट प्लेरूम्स, संपूर्ण इमारतीमध्ये सी सी टी वी, उच्चं शिक्षित शिक्षकवृंद, प्री-प्रायमरी एअर कंडिशन्ड कलासरूम्स, स्कूल बस सुविधा या सगळ्यांची  सोय करण्यात आली आहे, असे सावित्रीबाई गुलाब तुपे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश गुलाब तुपे यांनी सांगितले 

कार्यक्रमास सौ संतोषी तुपे - माननीय नगरसेविका पनवेल महानगर पालिका, जेष्ठ समाजसेवक श्री रवी गोवारी साहेब, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्री चंद्रकांत पाटील, श्री शशिकांत भगत साहेब, श्री संदीप तुपे साहेब, श्री उत्कल घाडगे साहेब आणि कामोठे, करंजाडे, डोम्बाला, पळस्पे मधील अनेक पालक-ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन आवळे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.
Comments