एस.टी. मधील प्रवाशाचा मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना प्रवाशांनी पकडले ....


पनवेल दि.५ (वार्ताहर) : गर्दीचा फायदा उचलत एसटी बस मधील एका प्रवाशाचा मोबाईल फोन चोरुन पळुन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन चोरट्यांना  एसटीमधील प्रवाशांनी  पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना सोमवारी सायंकाळी पनवेल एसटी स्टँडमध्ये घडली. ईरशाद राऊफ अन्सारी (30) व शमरुद्दीन जमालुद्दीन अन्सारी (44) अशी या  चोरटÎांची नावे असून पनवेल शहर पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल फोन हस्तगत केला आहे.  
या घटनेतील तक्रारदार दुखीश्याम दास (26) हा खोपोली येथे मित्रासह रहाण्यास असुन सोमवारी तो व त्याचा मित्र नवी मुंबईत कामानिमित्त आले होते. त्यानंतर दोघे नेरुळ येथून एसटीने पनवेल एसटी स्टँड येथे गेले. त्याठिकाणी खोपोलीला जाणारी एसटी लागल्यानंतर दुखीश्याम व त्याचा मित्र स्वराज या दोघांनी गर्दीतून सदर एसटी बस पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी एसटी बसमध्ये चढणाऱया प्रवाशांची गर्दी असल्याचा फायदा उचलत आरोपी ईर्शाद अन्सारी याने दुखीश्यामच्या खिशातील व्हीओ कंपनीचा मोबाईल फोन चोरला. मात्र दुखीश्यामला हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने चोरट्या ईर्शादकडे मोबाईलबाबत विचारणा केली. त्यामुळे चोरट्या  ईर्शादने चोरलेला मोबाईल फोन आपला साथिदार शमरुद्दीन अन्सारी याच्याकडे दिला. 
 त्यानंतर दोघांनी एसटी बसमधुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला असता, दुखीश्याम याने आरडा-ओरड केली. त्यामुळे इतर प्रवाशांनी या दोघा चोरटÎांना पकडुन दोघांना बेदम मारहाण केली. त्यानंतर दोघांना पनवेल शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी दोघा आरोपींची झडती घेतली असता, त्यांच्याकडे दुखीश्याम याच्याकडून चोरलेला मोबाईल फोन आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी दोघांवर चोरीचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले दोघे चोरटे भिवंडी येथे राहण्यास असून दोघेही रिक्षा चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Comments