विविध गुन्ह्यात हस्तगत केलेला सुमारे १ कोटींचा मुद्देमाल पोलिसांनकडून फिर्यादींना परत

पनवेल : नवी मुंबई पोलिसांनी विविध गुह्यांचा छडा लावून परत मिळविलेला सुमारे 1 कोटी रुपये किंमतीचा मुद्देमाल सोमवारी वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात 41 फिर्यादींना परत करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, अप्पर पोलीस आयुक्त महेश धुर्ये, परिमंडळ-1 चे पोलिस उपायुक्त सुरेश मेंगडे, सहाय्यक पोलिस आयुक्त विनायक वस्त, भरत गाडे तसेच परिमंडळ-1 मधील सर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी चोरीस गेलेला ऐवज परत मिळालेल्या नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करुन त्यांचे आभार मानले.  
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-1 अंतर्गत असलेल्या 10 पोलिस ठाण्यात मागील वर्षात दाखल असलेल्या विविध गुह्यांचा पोलिसांनी उत्कृष्टरित्या तपास करुन चोरीस गेलेला व फसवणुक केलेली मालमत्ता हस्तगत केली आहे. गत वर्षभरामध्ये परिमंडळ-1 मधील विविध पोलीस ठाण्याकडुन सुमारे 1 कोटी रुपये किंमतीचा मुद्देमाल परत मिळविला आहे. हाच मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यासाठी सोमवारी वाशीतील साहित्य मंदिर सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  
यावेळी पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांच्या हस्ते 41 फिर्यादिंना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला. या कार्यक्रमात सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोटार वाहने व इतर वस्तु फिर्यादिंना परत करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने चेन स्नॅचिंग, घरफोडी, चोरी तसेच फसवणूक या सारख्या गुह्यांचा समावेश आहे. यावेळी फिर्यादींना त्यांच्या मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानुन समाधान व्यक्त केले.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image