पनवेल कार्यक्षेत्रात ३२५ दिव्यांग, गरोदर माता, बेड रिडनचे लसीकरण..



पनवेल / दि. २४ : पनवेल कार्यक्षेत्रात आयुक्त  गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाला वेग मिळाला असून आजवर  दिव्यांग, गरोदर माता, बेड रिडन यांचे एकुण 325 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. 

 गेल्या काही दिवसापासून पनवेल कायक्षेत्रात लसीकरणाला वेग मिळाला असून आजवर 235 दिव्यांग, 27 अंथरूणाला खिळलेले अर्थात बेड रिडन, 61 गरोदर स्त्रीयांचे लसीकरण करण्यात आले आहे. कोविड लसीकरणाला वेग देताना समाजातील प्रत्येक घटकाला समावून घेण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिका विशेष लक्ष देत आहे. वैद्यकिय आरोग्य विभागाचे मुख्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी यांच्या सूचनेनूसार पालिकेच्या सहा नागरी प्राथमिक आरोग्य् केंद्राच्या लसीकरण टिमने आजवर बेघर- निराधार, दिव्यांग, अंथरूणाला खिळलेल्या, वृध्दाश्रमातील वयोवृध्द व्यक्ती, गरोदर स्त्रीया यांचे लसीकरण केले आहे. तसेच ग्रामीण भागातही लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. लसींच्या उपलब्धीनूसार येत्या काही दिवसात या लसीकरण केंद्रामध्ये वाढ करण्यात येणार आहे.

आजवर 17 शासकीय लसीकरण केंद्रावरती 2040 लसीकरण सत्रांमध्ये 2 लाख 64 हजार 393 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. तसेच खाजगी लसीकरण केंद्रावरती 1 लाख 53 हजार 194 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. एकुण 4 लाख 17 हजार 587 नागरिकांचे लसीकरण आत्तापर्यंत झाले आहे.
Comments