पनवेल दि.02 (वार्ताहर)- कळंबोली हायवे यथे छत्रपती शिवाजी महाराज श्रमिक महासंघ रिक्षा चालक मालक रिक्षा स्टॅन्डचे उद्घाटन शिवसेना सल्लागार बबनदादा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी फलकाचेसुद्धा अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमास डी एन मिश्रा कळंबोली शहर प्रमुख आणि शिवसेना युवा सेना पदाधिकारी रिक्षाचालक मालक उपस्थित होते दरम्यान समस्थ रिक्षा चालकांचा सन्मान करण्यात आला.
फोटोः छत्रपती शिवाजी महाराज श्रमिक महासंघ रिक्षा चालक मालक रिक्षा स्टॅन्डचे उद्घाटन