खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील गणेशोत्सव मंडळे,महिला दक्षता समिती,शांतता कमिटी सदस्य यांची बैठक संपन्न

पनवेल :-  दिनांक ३०/०८/२०२१ रोजी संध्याकाळी ०५:०० वाजता श्री कृपा हॉल सेक्टर ६ खांदा कॉलनी येथे सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल श्री. भागवत सोनवणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक खांदेश्वर पोलीस ठाणे श्री.देविदास सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली  खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गणेशोत्सव मंडळ,महिला दक्षता समिती सदस्य व शांतता कमिटी सदस्य यांच्या 
बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ,सदर बैठक गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना व परवानगीबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले,कोरोना महामारी मध्ये प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन होणे व गर्दी टाळावी ह्या साठी उपाय योजना करण्याबाबत व काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी ह्या बैठकीचे आयोजन करण्यात आले व सविस्तर माहिती देऊन मास्क चे वाटप करून मिटींग ची सांगता करण्यात आली...

 समस्त गणेशोत्सव मंडळ,महिला दक्षता समिती सदस्या , शांतता कमिटी यांनी सहभाग घेऊन पूर्णपणे मदत कार्य चालू ठेऊ व पूर्ण सहकार्य करू याचे आश्वासन  दिले.
Comments