दुचाकी वाहनांची चोरी
दुचाकी वाहनांची चोरी.....

पनवेल दि. २६ (संजय कदम): तळोजा परिसरातून दोन दुचाकी वाहनांची चोरी झाल्याची घटना घडली आहे.
        सूरज पाटील यांची 10 हजारांची एक्टीव्हा होंडा क्र.-एमएच 46 एस 6909 हि हलोबियर कंपनीच्या गेटबाहेर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. तर दुसऱ्या घटनेत विनायक घरत यांची 45 हजारांची होंडा सीबी शाईन क्र.-एमएच 46 बीएच 9768 हि आसाई इंडिया ग्लास कंपनीच्या गेटबाहेरील पार्कींगमध्ये उभी करून ठेवली असता चोरीस गेल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments