नगरसेवक राजू सोनी यांच्या तत्परतेमुळे धामण सापाला जीवदान....
पनवेल, दि.१७ (वार्ताहर)- घरात शिरलेल्या धामण सापाला  तत्परतेने नगरसेवक राजू सोनी यांनी सर्पमित्र विक्रांत काळे यांच्याशी संपर्क साधून जीवंतपणे धामण साप ताब्यात घेऊन त्याला खाडीत सोडल्याने त्या सापाला जीवदान तर मिळालेच तर फुलवाणी कुटूंबियांनी सुद्धा सुटकेचा निश्वास टाकला.          
शहरातील बावन बंगला ,किनारा सोसायटी येथे राहत असलेल्या जितेश फुलवाणी यांच्या घरी सकाळीअचानक बाहेरुन धामण नावाचा साप आल्यामुळे त्यांच्या घरातील सर्व खुप घाबरून गेले होते अशा वेळी काय करावे काय नाही हे त्यांना समजत नव्हते त्यावेळी त्यांनी आपल्या सगळ्यांचे लाडके ,गोर गरिबांचे कैवारी व संकट समयी पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नगरसेवक राजु सोनी यांना फोन करून सांगितले त्यांनी तात्काळ त्यांचे स्वीय सहाय्यक मंदार देसाई यांना सांगितले  ते लगेचच फुलवणी यांच्या घरी सर्प मित्र विक्रांत काळे यांना घेऊन गेले व सुरक्षित रीत्या सापाला पकडून बंदर रोड वरील खाडीत सोडले त्यामळे फुलवणी कुटुंबियांनी राजु सोनी व त्यांच्या स्वीय सहाय्यक मंदार देसाई व सर्प मित्र विक्रांत काळे यांचे खुप आभार मानले आहेत.         फोटोः सर्पमित्र विक्रांत काळे यांनी दिले धामण सापाला जीवदान
Comments