शिवसेना नेते ना.सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मनसेसह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश....

पनवेल दि. २३ (वार्ताहर)- आजच्या गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळसाहेब ठाकरे तसेच युवसेना प्रमुख व राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे  यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून, शिवसेना नेते उद्योग, खनिकर्म, आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मनसे नवीन पनवेल शहरप्रमुख तसेच इतर पदाधिकारी व भाजप उत्तर भारतीय रहिवासी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेऊन जाहिर प्रवेश केला.
          मनसेचे नवीन पनवेल शहरप्रमुख यतिन देशमुख, विभागप्रमुख अविनाश गव्हाणकर, केतन पाटील, सिद्धेश गुरव, अक्षय घाडी, सतिश गायकर, भाजपा उत्तर भारतीय रहिवासी सेलचे अध्यक्ष सि.पी. प्रजापती व सामाजिक कार्यकर्ते जितेश खिळदकर, सुनील जाधव, विकास वारदे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत हाती शिवबंधन बांधून जाहिर प्रवेश केला.  यावेळी त्यांचे स्वागत शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, उपमहानगर प्रमुख. दिपक घरत, नवीन पनवेल शहर प्रमुख रूपेश ठोंबरे, राजेंद्र भगत तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
         
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image