बँकेची 33 लाख 29 हजार रुपयांची फसवणूक.....
पनवेल : एका कंपनीच्या डायरेक्टरच्या सहीचा व लेटरहेडचा वापर करून आरटीजीएसद्वारे रक्कम ट्रान्सफर करावयास भाग पाडून आयडीबीआय बँकेची 33 लाख 29 हजार 479 रु
पनवेलच्या आयडीबीआय बँकेमध्ये इक्बाल हुसेन काझी यांनी एका कंपनीच्या प्रायव्हेट लिमिटेड या नावाने खाते उघडले. 12 जुलै रोजी बंकेत इक्बाल काझी या नावाने बोलत असल्याचा फोन आला. यावेळी चेक बुक संपले आहे, मेडिकल करायचे आहे आणि एक करोड रुपयांची मुदत ठेव करायचे आहे, मी संध्याकाळी बँकेत येतो असे त्याने सांगितले. यावेळी बैंक मेनेजरने लेटरहेडवर रिक्वेस्ट पाठवून द्या असे सांगितले. त्यानंतर त्याने त्याच्या अकाउंटवर 22 लाख रुपयांच्या आरटीजीएस जमा झाले का याबाबत विचारले असता ते जमा झाले नसल्याचे बँकेने सांगितले. त्यानंतर पुन्हा फोन करून काझी याने इमेल वर रिक्वेस्ट लेटर पाठवले असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी दिलेल्या बँक अकाउंट मध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे रक्कम आरटीजीएस द्वारे पाठवली. त्यानंतर बँकेतील रिलेशनशिप मॅनेजरने इक्बाल काझी याने त्याच्या अकाउंट मधून आरटीजीएस वरती रक्कम ट्रान्सफर केलेली आहे, ती त्यांनी केलेली नसल्याचे बँक मेनेजरला सांगितले
इक्बाल काझी बोलत असल्याचे खोटे सांगून बँकेत वैद्यकीय कारणात्सव रक्कमेची मागणी करून प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे डायरेक्टरच्या सहीचा व लेटर हेडचा वापर करून त्याद्वारे बँकेची दिशाभूल केली. आणि 3 बँकेतील चार अकाउंट वर 33 लाख 29 हजार चारशे रुपयांची रक्कम ट्रान्सफर करावयास भाग पाडले. आणि बँकेची ऑनलाईन फसवणूक केली.