पनवेल / २५ जून, २०२१: दीपक फर्टीलायजर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएफपीसीएल) हा भारतामधील सर्वात विश्वासार्ह रसायन आणि खत निर्मातादार मानला जातो. औद्योगिक रसायने (इंडस्ट्रीयल केमिकल्स), पीक पोषण (क्रॉप न्यूट्रीशन) तसेच खाण रसायने (मायनिंग केमिकल्स)मध्ये कंपनीचे बळकट अस्तित्व असून ही कंपनी अर्थकारणातील महत्त्वाची क्षेत्रे जसे की कृषी, औषध निर्मिती, खाण, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि स्वच्छता व तत्सम क्षेत्रांना सहाय्य करते.
देशात कोविड-19चा प्रादुर्भाव वाढल्यानंतर डीएफपीसीएलने या आपत्ती विरोधातील लढ्यात मोठ्या जिद्दीने आपले योगदान दिले. ईशान्य फाउंडेशन ही या कंपनीची सीएसआर एजन्सी आहे. सरकार आणि संबंधित एजन्सींच्या खांद्याला खांदा लावून ती देशात लोकांवर पडलेल्या महासाथीच्या प्रभावाचे उच्चाटन करण्याच्या दिशेने अविरत कार्यरत करते आहे. या दिशेने प्रकल्पाच्या कक्षेत येणाऱ्या कर्मचारी तसेच स्थानिक समुदायाला मदत करण्याच्या दृष्टीने काही पाऊले उचलण्यात आली.
महासाथीने निर्माण केलेल्या आव्हानात्मक स्थिती दरम्यान डीएफपीसीएल कोविडच्या विरोधात अविरत सहायता करतो आहे. कंपनीच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या हाफकिन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांना २,५०० पीपीई किट्सचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे विविध सरकार आणि अन्य प्राधिकरणांना २,२०० लिटर्सहून अधिक हँड सॅनिटायजर्सचा पुरवठा करण्यात आला. कोविडशी निकराची झुंज देण्यात अग्रेसर असणाऱ्या या कंपनीने प्राणवायूची कमतरता ओळखून महाराष्ट्र सरकारला २५ ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटचे दान दिले. त्यासोबतच ५ पीएसव्ही ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प स्थापन केले. डीएफपीसीएलच्या वतीने बृहन्मुंबई महानगर पालिकेला (बीएमसी), पनवेल महानगर पालिका आणि महाराष्ट्रातील दोन अन्य रुग्णालयांना सात रुग्णवाहिका दान करण्यात आल्या. कंपनीने समाजातील मागास वर्गातील व्यक्तिंची देखभाल घेण्याच्या दिशेने २०००+ अन्नधान्य आणि आहाराची पाकिटे स्थलांतरीत, चालक तसेच तळोजा एमआयडीसी गावांतील आसपासच्या गरजूंना उपलब्ध करून दिली.
या पुढाकाराबद्दल बोलताना डीएफपीसीएलचे युनिट प्रमुख राधेश्याम सिंग म्हणाले की, “आपण एकीचे बळ वापरून नेहमीच विपरीत स्थितीवर मार्ग काढू शकतो. एक कंपनी म्हणून आम्हाला त्यावर विश्वास आहे. आमच्या कर्मचाऱ्यांना विषाणू संसर्गापासून वाचविण्यासाठी आवश्यक ती सर्व पाऊले हिरीरीने उचलण्यात आली आहेत. महासाथीच्या काळात कामाचे तास वाढले आहेत. आमचा प्रकल्प 12 तासांच्या पाळीवर 35-40% कर्मचारी क्षमतेने आळीपाळीने कार्यान्वित ठेवण्यात येतो.
कोविडसाठी घेण्यात आलेल्या उपाययोजनांशिवाय डीएफपीसीएलच्या वतीने तळोज्यानजीक असलेल्या गावांच्या कल्याणाकरिता कायमच प्रयत्न केले आहेत. अलीकडेच सुमारे रु.१५ लाखांचा खर्च करून कंपनीने तोंडारे गावातील शाळेचे नूतनीकरण केले. त्याशिवाय रु. ८.५ लाखांच्या अंदाजपत्रासह तोंडारे गावात १२ डिजीटल वर्ग सुरू करण्याची योजना आहे. जेणेकरून गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध होतील. तसेच स्थानिक गावांमधील आरोग्य देखभालीच्या पायाभूत सुविधांत सुधारणा व्हावी या उद्देशाने डीएफपीसीएल’च्या वतीने पनवेल महानगर पालिकेला रु.९ लाखांच्या रुग्णवाहिका दान केल्या आहेत.