शासनाचे सर्व नियम पाळून तिथीनुसार ३४८ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा....

पनवेल वैभव :-  रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील किल्ले रायगड गडावर आज दिनांक २३ जून रोजी शासनाचे सर्व नियम पाळून  तिथीनुसार किल्ले रायगडावर  ३४८ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला. 

महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले, शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील पवार, सतीश साळुंखे, रोहित पवार  व इतर अनेक मान्यवर व शिवभक्त यावेळी उपस्थित होते. हिंदू धर्म रीतीप्रमाने विधिवत पूजा यावेळी करण्यात आली.

ज्येष्ठ  शुद्ध त्रयोदशी या मराठी तिथीनुसार गेली अनेक वर्ष  किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा केला जातो. 
" आजच्या हिंदू तिथी प्रमाणे साजरा होत असलेल्या  शिवराज्याभिषेक दिनास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोष्यारी यांनी ५ लाख रुपयांचा निधी शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीकडे सुपूर्त केला आहे. तसेच दरवर्षी तशी रक्कम देणार असून त्यांना हिंदू तिथीप्रमाणे होणारा सोहळा बघायचा आहे व रायगडावर येणार असल्याचे सांगितले. "असे यावेळी शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी सांगितले.

कोकणकडा मित्रमंडळ महाड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती दुर्गराज रायगड  आणि जिल्हा परिषद रायगड यांच्या  संयुक्त रित्या  ३४८ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा किल्ले रायगडावर संपन्न झाला.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी  हा सोहळा ५० जणांच्या उपस्थितीत  शासनाच्या नियमानुसारच  हा सोहळा साजरा करण्यात आला.
Comments
Popular posts
शिबिरात दिलेला शब्द उपचारापर्यंत जपला ; रुग्णांच्या भेटीला प्रितम म्हात्रे...
Image
रुग्णालयातून घरी गेल्यानंतर उपचारांसाठी मेडिकव्हरचा ‘होमवॉर्ड’ उपक्रम..
Image
गणेशोत्सव मंडपात गिरविले ‘सीपीआर’चे धडे ; मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे नागरिकांना सीपीआरचे प्रशिक्षण...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संस्कृती आणि परंपरेचा उत्सवी रंग ; ढोल-ताशांच्या गजरात अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
Image