पनवेल : भाजीपाला खरेदी करताना 47 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून चोरटे पसार झाले आहेत. त्यांच्या विरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोट येथील बायमाबाई बाळाराम पाटील या घरासमोर भाजीपाल्याचे दुकान लावून भाजी विक्री करतात. दुकानासाठी लागणारा भाजीपाला ते पनवेल येथे खरेदी करत असताना एका स्कुटीवर बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन जोराने खेचली. व ते पळून गेले. 54 हजार 490 रुपये किमतीची सोन्याची चेन खेचून नेल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.