पत्रकारांना लसीकरणामध्ये प्राधान्यक्रम द्यावा ; नगरसेवक सतीश पाटील...

पनवेल, दि.3 (संजय कदम) ः कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून लोकशाहीच्या चौथ्या स्तभाची शान राखून उत्तंम प्रकारचे काम करून शासनाची विविध स्तरावरील माहिती जनतेपर्यंत सक्षमरीत्या पोचवून समाजसेवेचे व जनजागृतीचे काम करणार्‍या पनवेल सहित संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकारांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे लसीकरण करताना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी पनवेल महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक सतीश मोहन पाटील यांनी लेखी पत्राने आयुक्तांकडे केली आहे.
गेल्या मार्च महिन्यापासून पनवेल महानगरपालिका क्षेत्रात लसीकरण सुरू आहे. एक लाखापेक्षा जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. मनपा प्रशासनाने केलेल्या या व्यवस्थेबाबत प्रशासकीय प्रमुख म्हणून प्रशासनाचे जाहीरपणे आभार मानले जात आहेत. परंतु हे करीत असताना पनवेल परिसरातील पत्रकारांना लसीकरणा मध्ये प्राधान्यक्रम देण्यात येत नाही. ही बाब  खेदजनक आणि चिंता व्यक्त करणारी आहे. पनवेल चे पत्रकार आपला जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांपर्यंत बातम्या पोचवण्याचे माध्यम म्हणून महत्वाचे काम करीत आहेत. महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या सूचना आणि प्रेस नोटची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकारांकडून केले जाते. हे सर्व बांधव सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांच्यावर त्यांच्या परिवाराची जबाबदारी आहे. या सर्व अनुषंगाने पनवेल च्या सर्व पत्रकार बांधवांना व त्यांच्या कुटुंबियांना फ्रंन्टलाइन वर काम करणारे म्हणून त्यांना त्वरित कोरोना लस देण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी न्याय्य मागणी पनवेल महापालिकेतील कार्यतत्पर नगरसेवक सतिश मोहन पाटील यांनी एका लेखी पत्रान्वये पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.
फोटो ः सतीश पाटील
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image