पांडव कड्यासह इतर धबधब्यांवर पर्यटकांना नो एन्ट्री......

पांडव कड्यासह इतर धबधब्यांवर पर्यटकांना नो एन्ट्री

पनवेल, दि. १२ (संजय कदम) ः पनवेल जवळील पांडव कड्यासह इतर छोट्या मोठ्या धबधब्यांवर पर्यटकांनी वर्षासहलीसाठी येवू नये असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात येत आहे.
या संदर्भात खारघर पोलीस ठाणे कडून सर्व नागरिक व पर्यटक यांना जाहीर आव्हान करण्यात आले आहे की, खारघर मधील डोंगर भागात पावसाचे पाणी पडल्यामुळे मोठया प्रमाणात पाण्याचे झरे निर्माण होऊन, खारघर परिसरातील पांडवकडा, चाफेवाडी, फणसवाडी, ड्रायव्हिंग रेंज, घामोळे गाव, ओवे कॅम्प डोंगर व धरण परिसर तळोजा जेल समोर डोंगर व तळोजा समोरील तलाव तसेच आजूबाजूच्या परिसरात पावसाचे लहान-मोठे धबधबे चालू होतात. त्यामुळे पावसाळी पर्यटनाचे स्वरूप प्राप्त होते, तेव्हा डोंगरावरून वाहणार्‍या पाण्यामुळे पांडवकडा, चाफेवाडी,फणसवाडी व ओवे काम धरण व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या धबधबा तयार होतात तेव्हा सदर ठिकाणावर दर शनिवार, रविवार, इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटक या धबधब्याच्या धारेखाली बसण्यासाठी येथे जमा होतात. पाण्याच्या डोहात पोहण्यासाठी जातात तेव्हा पाण्याच्या धबधब्या सोबत डोंगरावरील दगड घरंगळत येऊन बधब्या खाली बसलेल्या पर्यटकांच्या डोक्यात पडून त्यांना गंभीर दुखापती होतात. तसेच सदर परिसरात जमा झालेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक पर्यटक पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे यापूर्वी झालेले आहे. मागील वर्षी 4 तरूणी पाण्यात बुडून मृत्यु पावले होत्या. अशा घटना होऊ नये याकरता विशेष कार्यकारी दंडाधिकारी पनवेल विभाग, नवी मुंबई, यांचेकडून यांचेकडून फौजदारी प्रक्रिया सहिता चे कलम 144 प्रमाणे दिनांक 07 जून 2021 ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत. तरी याद्वारे सर्व खारघर रहिवाशी व पर्यटक यांना सुचित करण्यात येते की सदर प्रतिबंधित क्षेत्रात पर्यटन करताना कोणी व्यक्ती मिळून आल्यास त्यांच्यावर खारघर पोलीस ठाणे कडून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी सांगितले आहे.
फोटो ः शत्रुघ्न माळी
Comments