कामोठे पोलिसांची धडक कारवाई ; २६ हजारांचा देशी-विदेशी बनावटीचा मद्यसाठा व रोख रक्कम हस्तगत...


पनवेल, दि.५ (संजय कदम) ः सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात व कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बेकायदेशीरित्या देशी-विदेशी मद्यसाठा करून तो चढ्या दरात विक्री करण्यास बंदी असतानाही कामोठे वसाहतीमध्ये काही जण बेकायदेशीररित्या अशा प्रकारे मद्यसाठा विक्री करीत असल्याची माहिती वपोनि स्मिता जाधव यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने धडक कारवाई करून जवळपास 26 हजाराचा देशी विदेशी मद्यसाठा व रोख रक्कम हस्तगत केली आहे.
कामोठे वसाहतीमधील ब्ल्यू हेवन अपार्टमेंट प्लॉट नं.8-ए, सेक्टर 35 या बंद इमारतीच्या भिंतीला आडोश्याला व गाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देशी-विदेशी मद्यसाठा करून त्याची विक्री होत असल्याची माहिती कामोठे पोलीस ठाण्याचे वपोनि स्मिता जाधव यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम सुरवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तांबे, पोलीस उपनिरीक्षक सुरज राऊत आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून आरोपी भावेश कन्हैय्या सचदेव (25) व नितीन मनोज सचदेव (25) या दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून जवळपास 26 हजाराचा ऐवज हस्तगत केला आहे व त्यांच्या विरुद्ध भादवी कलम 188, 270, 271 सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई) सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 (ब) सह साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image