पनवेल दि.23 (संजय कदम)- कोवीड -१ ९ या साथीच्सा रोगावर प्रभावी ठरणा - या व संपुर्ण भारतामध्ये तुटवडा असणा - या रेमडेसिवीर इंजेक्शनचा गैरमार्गाने काळया बाजारामध्ये हजारो रूपये किंमतीत विक्री करणा - या रॅकेटचा मध्यवर्ती कक्ष , गुन्हे शाखा नवी मुंबई यांचेकडुन पर्दाफाश केला असून याप्रकऱणी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह, अपर पोलीस आयुक्त डॉ. बी.ज.शेखर पाटील, नवी मुंबई यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये रेमडेसीविर इंजेक्शन काळा बाजार करून जनतेच्या जिवीताशी खेळुन एमआरपी पेक्षा जास्त भावाने विकी करणा - या इसमावर कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार नवी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त प्रविणकुमार पाटील, सहायक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण , गुन्हे शाखा , नवी मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली मोहीम सुरू आहे. खारघर येथील लिटील वर्ल्ड मॉलचे समोरील रोडवर , सेक्टर ७ खारघर या ठिकाणी एक इसम हा कोवीड -१ ९ या साथीच्या आजारासाठी वापरात येणारे दोन रेमडेसीविर इंजेक्शन ४०,००० / - रू . किंमतीस विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली होती . वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन . बी कोल्हटकर व पथकाने त्या ठिकाणी सापळा रचुन इसम नामे हरपदर कपुर सिंग वय ४१ वर्षे , धंदा- ट्रान्सपोर्ट , रा . बल सोसायटी , बिल्डींग नं- जी -१ , रूम नं- ०२ , से -१० , कळंबोली , नवी मुंबई यास ताब्यात घेतले. त्याचेकडे दोन रेमडेसीविर इंजेक्शन बेकायदेशीरित्या मिळून आले ते दोन रेमडेसीविर इंजेक्शन तो ४०,००० / - रू किंमतीमध्ये विकीकरीता आला असल्याचे कबुल करून त्याबाबत त्याचेकडे कोणतेही कायदेशीर कागदपत्रे नसल्याचे आढळुन आल्याने तो ते दोन रेमडेसीविर इंजेक्शन काळया बाजारामध्ये एमआरपी किंमतीपेक्षा जास्त किंमतीत विक्री करण्या करीता आल्याचे निष्पन्न झाले . त्याचे ताब्यातुन दोन रेमडेसीविर इंजेक्शन, एक मारूती सीयाझ कार , एक मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण ५,१८,००० / - रू . किंमतीचा मुद्येमाल जप्त केला असुन त्याचेविरूध्द् औषध निरीक्षक , एफडीआय रायगड यांचेशी संपर्क करून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून खारघर पोलीस ठाणे गु रजि.नं. १५७/२०२१ भादवि कलम ४२० सह औषधे किमत नियंत्रण आदेश २०१३ परिच्छेद २६ सह जिवनाश्यक वस्तुचे अधिनियम १ ९ ५५ चे वाचन अधिनियम ३ ( २ ) ( सी ) , दंडनिय कलम ७ ( १ ) ( अ ) बा ) सह औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १ ९ ४० व त्याखालील नियम मधील कलम १८ ( सी ) चे दंडनीय कलम २७ ( ब ) ( IT ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपीस अटक आलेली असुन त्याची दिनांक २६/०४/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे . गुन्हयाच्या पुढील तपासामध्ये अटक इसमाकडे मिळून आलेले दोन रेमडेसीविर इंजेक्शन हे नवी मुंबई मधील एका कोविड रूग्णालयामधुन तेथील डॉक्टर व नर्स यांनी संगणमत करून ७ ते ८ रेमडेसीविर इंजेक्शन बाहेर काळया बाजारामध्ये विक्री करीत असल्याचे आढळून आल्याने डॉक्टर सर्वजत कमलकांत सिंग वय २७ वर्षे , रा . नेरूळ , नवी मुंबई , मुळ रा बिहार यास अटक करण्यात आली असुन यामध्ये रेमडेसीविर इंजेक्शन काळया बाजारामध्ये विकी करणारे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे . सदरची कामगिरी मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक , एबी कोल्हटकर , सपोनि , निलेश तांब , सपोनि . ज्ञानेश्वर भेदोडकर , सपोनि गंगाधर दवडे , सपोनि विजय चव्हाण , सपोउपनिरी , संजय पवार , पोलीस अंमलदार अतिश कदम , उर्मिला बोराडे , सतिश सरफर , विष्णु पवार , सचिन धनवटे , सचिन टके , चापोन सतिश चव्हाण , मेघनाथ पाटील , राहुल वाघ यांनी केलेली असुन पुढील तपास मध्यवर्ती कक्ष , गुन्हे शाखा हे करीत आहेत.
फोटोः गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने अटक केलेल्या आरोपींसह पथक