संपूर्ण महाराष्ट्रातील सीफेरर्सना कोविड-१९ लस देण्यात यावी ; ऑल इंडिया सीफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियनची मागणी...पनवेल / वार्ताहर :- महाराष्ट्रातील अनेक सीफेरर्स हे कामानिमित्त सतत बाहेरगावी ये-जा करत असतात. त्या साठी सीफेरर्सना प्राधान्य देवून कोविड-१९ प्रतिबंधनात्मक लसीकरण करणे अत्यावशक आहे अशी मागणी ऑल इंडिया सिफेरर्स आणि जनरल वर्कर्स युनियनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना करण्यात आली आहे.

जागतिक व्यापारी उलढलीत समुद्री वाहतुकीचा सिंहाचा वाटा आहे. हे लक्षात घेत आपल्या लक्षात येईल की एका सिफेररच्या कामच क्षेत्र किती मोठ आहे. त्याकारणे तो अति धोकादायक वातावरणात कार्यरत असतो. 
      साइन इन व साइन ऑफ सुरू झालेले असून बऱ्याच सीफेरर्सची आदलाबदली ची शक्यता वाढली आहे. त्यामुळे पुढील धोके टाळण्यासाठी आत्ताच प्राधान्याने सीफेरर्सना कोविड-१९ प्रतिबंधनात्मक लसीकरण करणे गरजेचे आहे.
वसई-विरार  विशेष करुन हे सीफेरर्स आणि क्रुझशिपिंग क्षेत्रात काम करणाऱ्या सीफेरर्सचे माहेरघर म्हणूनप्रसिद्ध आहे, तेथेतर विशेष करुन याप्रकारची मोहीम राबवणे अत्यंत गरजेचे आहे अशी काळजी युनियन कार्यध्यक्ष अभिजीत दिलीप सांगळे यांनी वसई विरार शहर महानगर पालिकेचे आयुक्त श्री. गंगाधरण यांना पत्राद्वारेव्यक्त करण्यातआली.
       
यूनियनच्या मागणीला योग्य प्रतिसाद मिळावा ही  सकारात्मक आशा युनियनचे अध्यक्ष संजय वासुदेव पवार यांना आहे.Comments