दिव्यांग व्यक्तींना प्रथम प्राधान्याने लस मिळावी व न येऊ शकणाऱ्यांचे घरी जाऊन लसीकरण व्हावे : गुरुनाथ पाटील
खारघर / प्रतिनिधी  : पनवेल महानगर पालिकेतर्फे ४५ वर्षांवरील सर्वांसाठी उत्तम व्यवस्था करण्यात आल्याचे नागरिकांतर्फे निदर्शनात आले असल्याचे शिवसेना पनवेल तालुका महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील यांनी सांगून पालिकेचे एकप्रकारे कौतुक केले आहे. 
मात्र दिव्यांग (अपंग) व्यक्तींकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते त्यांच्यासाठी प्रथम प्राधान्य मिळणे आवश्यक आहे तसेच त्यांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिका असावी जेणेकरून त्यांना सहाय्यकारी होईल, त्याचप्रमाणे काहींना लसीकरण केंद्रापर्यंत येता देखील येत नाही अशांसाठी त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करावे अशी विनंती वजा मागणी शिवसेना पनवेल तालुका महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील यांनी महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Comments