पोलिसांच्या मदतीला होमगार्डस् सक्रिय ; परिमंडळ २ मध्ये ४० होमगार्ड बंदोबस्तात...
पनवेल, दि.16 (संजय कदम) ः पनवेल परिसरात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता नवी मुंबई पोलीस विभागात कमी मनुष्यबळ असल्याच्या कारणास्तव कोरोना काळात नवी मुंबई पोलिसांच्या मदतीला होमगार्ड सक्रिय झाले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2 मधील सात पोलीस ठाण्यात एकूण 40 होमगार्ड दाखल झाले आहेत. त्यानुसार पनवेल, कळंबोली, कामोठे, खांदेश्‍वर, तळोजा, ग्रामीण भागात पोलिसांसोबत पोलिसांच्या मदतीला होमगार्ड दिसत आहेत.

नवी मुंबई व पनवेल परिसरात कोरोनाने मोठ्या प्रमाणात पाय पसरले आहे. पनवेल परिसरातील गावा- गावांमध्येही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यासाठी नवी मुंबई महापालिका व पनवेल महानगरपालिकेने प्रशासनाने काही कडक निर्बंध जाहीर केले आहे, मात्र त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेशा प्रमाणात पोलीस कर्मचारी नाही. निर्बंधाची कडक अंमलबजावणी व्हावी म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात परिमंडळ 2 मधील पोलिसांच्या मदतीला पुन्हा होमगार्डला पाचारण करण्यात आले आहे. त्यानुसार परिमंडळ 2 मधील पनवेल शहर, कामोठे, पनवेल तालुका, खांदेश्‍वर, तळोजा, कळंबोली आणि खारघर पोलीस पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांच्या मदतीसाठी होमगार्ड्स देण्यात आले आहेत. हे होमगार्ड पोलिसांच्या मार्गदर्शनात कोरोना काळात चांगल्याप्रकारे कर्तव्य बजावत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांसोबत बाजारात, विविध चौकात वाहतूक सुरळीत ठेवणे, विना मास्क, तीबलसीट दुचाकी चालविणार्‍यांकडे लक्ष देणे आदी कामे ते करताना दिसत आहेत.

Comments