पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने केले लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन
सिटी बेल / पनवेल.
 खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला ब्रिटीश कौन्सिलचा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा इंटरनॅशनल डायमेन्शन पुरस्कार मिळाल्याबद्दल पनवेल तालुका संघर्ष समितीने लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन केले.
        
जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर यांना नुकतेच ब्रिटिश कौन्सिलच्या वतीने सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक देवाण-घेवाण वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने ही संस्था अनेक स्तरीय निकषांवर हे पुरस्कार देत असते.रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती व तिचा गोडवा यांचे अत्युत्तम सादरीकरण केले होते. त्याबद्दल रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल या शाळेस इंटरनॅशनल डायमेन्शन्स हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा हा पुरस्कार पटकावल्यामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या तमाम सदस्यांचे आभार मानले तसेच वेळोवेळी तुमचे सहकार्य राहिले आहेत ते भविष्यात देखील असेच राहू द्या अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष निलेश सोनावणे, सरचिटणीस विशाल सावंत,उपाध्यक्ष प्रवीण मोहोकर,मंदार दोंदे,विवेक पाटील,संजय कदम,संतोष सुतार, सुनील कटेकर आदी उपस्थित होते.
Comments