नॅशनल बॉडीबिल्डिंग चॅम्पीयनशीप स्पर्धेत स.पो.नि सुभाष पुजारी यांना सुवर्ण पदक "मास्टर भारत श्री २०२१" किताबाचे मानकरी


पनवेल / वार्ताहर :- सहा.पोलीस निरीक्षक , सुभाष पुजारी "मास्टर भारत श्री २०२१ " किताबाचे मानकरी चौथ्या मास्टर भारत श्री २०२१ " शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये किताब मिळविणारे भारतातील पहिले पोलीस अधिकारी मास्टर आशिया श्री २०२१ स्पर्धेसाठी भारतीय संघामधून निवड, इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशन यांचे वतीने बिॉडीबिल्डिंग दिनांक २० व २१ मार्च २०२१ रोजी लुधियाना पंजाब येथे घेण्यात आलेल्या ११ व्या मेन्स ज्युनिअर / मास्टर / दिव्यांग / वुमेन ज्युनिअर / ज्युनिअर नॅशनल बॉडीबिल्डिंग चॅम्पीयन शीप २०२१ या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र टिम मधून "मास्टर भारत श्री 2021" खेळताना ८० किलो वरील गटामध्ये सुभाष पुजारी , सहा.पोलीस निरीक्षक यानी शरीर सौष्ठव स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले आहे. 
"मास्टर भारत श्री" 2021 किताब मिळविणारे सुभाष पुजारी  हे भारतातील पहिले पोलीस अधिकारी आहेत . ही बाब पोलीस खात्याची मान व शान वाढविणारी आहे . त्यांच्या या यशाबददल पोलीस खात्यामध्ये एक मानाचा तुरा रोवला गेला आहे . 
दिनांक ०१ ते ०७ सप्टेंबर २०२१ दरम्यान मालदीव येथे होणाऱ्या आंतर राष्ट्रीय Master Asia Shree 2021 या बॉडीबिल्डिंग स्पर्धेमध्ये त्यांची निवड भारतीय संघातून झाली आहे . 
सुभाष शंकर पुजारी , सहा.पोलीस निरीक्षक हे महामार्ग पोलीस मदत केंद्र पळस्पे येथे प्रभारी अधिकारी म्हणुन कर्तव्यावर आहेत . त्यांनी महामार्ग पोलीस विभागात मुंबई पुणे द्रुतगर्ती मार्गावर वरिष्ठांच्या आदेशाने वेळोवेळी वेगवेगळी उपक्रम राबवून महामार्गावरील कसुरदार वाहन चालकांवर जास्तीत जास्त करावाई करून अपघाताचे प्रमाणे ४० टक्याने कमी केले . कोल्हापुर येथे नैसर्गिक आपर्तीमुळे पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे कोल्हापुर वासियांचे जनजीवन विस्कळीत झाले होते अशा वेळी त्यांनी आपला समाजातील असलेला जनसंपर्क , मित्रमंडळी व महामार्ग पोलीस पळस्पे , नवी मुंबई यांचेकडून कोल्हापुर येथील ६०० कुटुंबियांना किमान ८ दिवस पुरेल इतका राशन पुरवठा केला होता . त्याचबरोबर कोरोना काळात महामार्ग पोलीस व त्यांचे कुटुंबियांना कोरोनाचा संसर्ग होवू नये त्याकरीता आपला जनसंपर्क वापरून सॅनिटायझर , मास्क , शिल्ड , हॅन्ड ग्लोज , पावसाळी रेनकोट , विंटर रिप्लेक्टर जॅकेट इत्यादी साहीत्य साधनसामुग्री उपलब्ध करून संपूर्ण महाराष्ट्रातील महामार्ग पोलीसांना पुरविले . 
सदरचे यश हे सुभाष शंकर पुजारी , सहा.पोलीस निरीक्षक यांनी त्यांचे पोलीस खात्यातील दैनंदिन कर्तव्य सांभाळुन जिदद , चिकाटीने व अथांग प्रयत्नाने मिळविलेल्या या यशाबददल मा ना . सतेज पाटील , गृहराज्य मंत्री , मा.ना. शभुराजे देसाई , गृहराज्य मंत्री , मा.आ.सुजित मिणचेकर , हातकनगले , मा . श्री हेमंत नगराळे पोलीस आयुक्त , मुंबई शहर , डॉ भूषणकुमार उपाध्याय , अपर पोलीस महासंचालक , वाहतूक म , रा मुंबई , श्री विनय कारगांवकर , अपर पोलीस महासंचालक , श्री अभिनव देशमुख , पोलीस अधीक्षक , ठाणे ग्रामिण , प्रशांत होळकर , पोलीस अधीक्षक , वर्धा , अनिल पारसकर , पोलीस अधीक्षक , श्री . अशोक दुधे , पोलीस अधीक्षक रायगड , श्रीमती सुनिता साळुखे / ठाकरे , डॉ दिगंबर प्रधान , श्री . संजय जाधव , सर्व पोलीस अधीक्षक , महामार्ग पोलीस यानी विशेष अभिनंदन केले . त्यांच्या या भरघोस यशाबददल पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी व अंमलदार व मित्रपरिवार नातेवाईक , वेगवेगळया पक्षाचे पदाधिकारी , समाजसेवक यांचेकडून कौतुकास्पद अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . त्याचबरोबर त्यांच्या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा ही दिल्या जात आहेत . 
सुभाष पुजारी हे अशिया श्री सुनित जाधव आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव पटटू यांच्या मार्गदर्शनाखाली रोज ५ तास वन अबाव जिम , नेरूळ व रिसेट जिम बांद्रा येथे सराव करीत आहेत . श्री पुजारी याना मिळालेल्या यशामध्ये मा . श्री हेमंत नगराळे पोलीस आयुक्त , मुंबई शहर , डॉ भूषणकुमार उपाध्याय , अपर पोलीस महासंचालक , वाहतूक म . रा मुंबई , श्री चेतन पठारे , सेकटरी वर्ल्ड बॉडीबिल्डिंग असोशियन , शाम रहाटे , आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव पटू , सचिन शिंदे पुणे शहर पोलीस , विपुल पाटील , पनवेल यांचे विशेष सहकार्य लाभले . असे सहा .पोलीस निरीक्षक , सुभाष पुजारी यानी  वार्ताहारांशी बोलताना सांगितले .
Comments