मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नाने अमरधाम स्मशानभूमीच्या गॅसदाहिनीच्या चिमणीची उंची वाढवण्यात आली

पनवेल / वार्ताहर :- प्रभाग क्र १८ मधील येणाऱ्या अमरधाम स्मशानभूमीच्या गॅस दहिनी चा वापर खूप कमी वेळा होत असे. परंतु करोना काळात मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे गॅस दाहिनी मध्ये अंत्यविधी जास्त प्रमाणात होऊ लागले होते.गॅस दाहिनी च्या चिमणीची उंची कमी असल्या कारणाने धुराचा प्रभाव १ किमी अंतरापर्यंत जाणवायला लागला होता. धुरामुळे परिसरातील रहिवाशांना श्वसनाचा त्रास होऊ लागला होता तसेच धुरामुळे सर्वांना घरांच्या खिडक्या बंद करूनच बसावे लागत होते.या चिमणीची उंची वाढवावी किंवा धूर हवेत मिसळला जाणार नाही असे एखादे तंत्रज्ञान विकसित करून नागरिकांची या समस्येतुन सुटका करावी याबाबत चे पत्र नगरसेवक विक्रांत पाटील यांनी आकुयतांना दिले होते त्याचबरोबर या विषयाचा यशस्वी पाठपुरावा करून अमरधाम गॅस दाहिणीच्या चिमणीची उंची वाढवून घेतली व कामाला ही सुरुवात करून घेतली.नगरसेवक विक्रांत पाटील आपल्या प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी आत्मीयतेने घेतात त्याबद्दल रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.


Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image