मोटार सायकलची चोरी...

पनवेल, दि.१३ (संजय कदम) :-  पनवेल परिसरातून दोन मोटार सायकलची चोरी झाल्याची घटना घडल्याने वाहन मालकांमध्ये भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील ब्रीजच्या खाली अमित साबळे यांनी उभी करून ठेवलेली लाल रंगाची अ‍ॅक्टीव्हा स्कूटी गाडी ज्याची किंमत २० हजार रुपये इतकी आहे. ती चोरुन नेल्याची घटना घडली असून याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 
तर दुसर्‍या घटनेत गणेश साठे यांनी त्यांची काळ्या रंगाची हिरोहोंडा पॅशन मोटार सायकल जीची किंमत २० हजार रुपये इतकी आहे ही एलएक्सआर स्पेशालिटी ऑईल प्रा.लि. कंपनीच्या गेट बाहेर पडघे गाव येथे उभी करून ठेवली असता सदर वाहनांची चोरी झाल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image