वाचनालय एक आदर्श साहित्य वास्तू - लोकनेते रामशेठ ठाकूर

   
 के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या उत्कर्षासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून ०२ लाखांची मदत 
 
७० व्या वाढदिवसानिमित्त ७० पुस्तकांची भेट 

पनवेल (प्रतिनिधी)  के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय हे नवोदित तसेच होतकरू साहित्यिक, कवी, लेखक यांना नेहमीच प्रोत्साहित करीत आहेत, त्या अनुषंगाने या वाचनालयाचा अधिक उत्कर्ष व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज(दि. ०२ मार्च) ०२ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 
पनवेलच्या साहित्यिकांच्यावतीने मराठी भाषा दिनानिमित्त व लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ७०व्या वाढदिवसानिमित्त पनवेलमधील साहित्यिकांची ७० पुस्तके लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते के. गो. लिमये वाचनालयाला भेट देण्यात आली. त्यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर ठाकूर यांनी या वाचनालयाच्या प्रति आपले भावनिक नाते असल्याचे स्पष्ट करत या वाचनालयातून आणखी साहित्यिक, लेखक, कवी निर्माण होतील असा विश्वास व्यक्त करीत वाचकांसाठी हे वाचनालय एक आदर्श साहित्य वास्तू असल्याचे नमूद केले. 

या कार्यक्रमास सुप्रसिद्ध गझलकार ए. के. शेख, कोकण मराठी साहित्य परिषद  नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी, साहित्यिक प्रा. चंद्रकांत मढवी, ज्योत्स्ना राजपूत, गणेश म्हात्रे, रामदास गायधने, नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य श्याम पुंडे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या सहचिटणीस जयश्री शेटये, ग्रंथपाल निकिता शिंदे, पत्रकार रमेश भोळे, सुमंत नलावडे, लक्ष्मण ठाकूर आदी उपस्थित होते. 

यावेळी सुप्रसिद्ध गझलकार ए. के. शेख यांनी म्हंटले कि, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा यंदा ७० वा वाढदिवस साजरा होत आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर नेहमीच साहित्यिक, कवी. लेखकांना प्रोत्साहन देत असतात. साहित्यिकांबद्दल त्यांना आस्था असून या नगरीचे ते पालक आहेत. 
  
कोकण मराठी साहित्य परिषद  नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी आपल्या प्रास्तविकात सांगितले कि, कवी, लेखक, साहित्यिक आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे जवळचे नाते आहे. साहित्यिक वारसा पुढे चालत रहावा यासाठी वाचनालयीन पुस्तके भेट देत आहोत असे सांगून हा साहित्यिकांसाठी आगळावेगळा उपक्रम आल्याचा आवर्जून उल्लेख केला. 
  
यावेळी के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या  सहचिटणीस जयश्री शेटये, ग्रंथपाल निकिता शिंदे यांनी वाचनालयाच्यावतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केलेल्या ०२ लाख रुपयांच्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले. 
Comments
Popular posts
पनवेलमध्ये सौर प्रकल्प निर्मिती व आधुनिक महिला सुविधा केंद्र उभारा - ममता प्रितम म्हात्रे
Image
नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image