मॉर्निंग वॉक करणाऱ्या तरूणाची चेन खेचून दोघेजण पसार...


पनवेल दि.९ (वार्ताहर)- मॉर्निंग वॉक करणाऱ्या तरूणाच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून दोन अज्ञात इसम मोटारसायकलीवरून पसार झाल्याची घटना कामोठे वसाहतीत घडली आहे.
           विशाल वगरे (वय-२५, रा.-कामोठे) हा सकाळच्या वेळेस मॉर्निंग वॉक करत असताना से.-३६ परिसरात पायी जात असताना अचानकपणे मोटारसायकलीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्याच्या गळ्यातील १५ हजारांची सोन्याची चेन खेचून पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार कामोठे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments