१५ हजाराची लाच स्वीकारताना म.रा.वि.वि. कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना रंगेहाथ पकडले


पनवेल, दि.२२ (वार्ताहर) :-  वर्क कम्प्लिशन रिपोर्ट देण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदाराकडे १५ हजाराची लाच मागितली. याप्रकरणी सदर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केल्यानंतर आज सायंकाळी सापळा रचून सदर कार्यकारी अभियंत्यांला सदर लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
तक्रारदार नोकरी करीत असलेल्या श्री म्हाळसा एंटरप्रायझेस या कंपनीमार्फत नेरळ येथील बांधकामाच्या ठिकाणी ट्रान्सफार्मर बसविले. नंतर वर्क कम्प्लिशन रिपोर्ट देण्याकरिता आरोपी लोकसेवक कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कंपनी लि. पनवेल ग्रामीण (वर्ग-1) चे शैलेशकुमार कांबळे (52) यांनी १५ हजाराची लाच मागितली व सदर लाच स्वीकारताना आज त्यांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधिक्षक श्रीमती.ज्योती देशमुख यांच्या मार्गदर्शनाखली पो.हवा.पवार, पो.हवा.परदेशी, चापोहवा गायकवाड, पो.ना.फडतरे, पो.ना.ताम्हाणेकर आदींच्या पथकाने पकडले आहे. 

चौकट
पनवेलसह नवी मुंबई हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून घेण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असेल तर तात्काळ यांनी अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, नवी मुंबई दूरध्वनी 2783344 किंवा मो.नं.9967438202, टोल फ्री क्र.1064 येथे संपर्क साधावा.
Comments
Popular posts
नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image