पनवेल, दि.३ (वार्ताहर) ः कामोठे वसाहतीमधील मेघना वाईन शॉपसह सिटी मोटर्स स्पेअर पार्टस् या दुकानात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लाखो रुपये किंमतीचा माल चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
मेघना वाईन शॉप कामोठे सेक्टर ३५ व सिटी मोटर्स स्पेअर पार्टस् सेक्टर ६ या दोन दुकानाचे अज्ञात चोरट्याने मुख्य शटर उचकटून आतमध्ये ठेवलेली रोख रक्कम तसेच देशी विदेशी मद्य साठा असा मिळून जवळपास १,०५०००/- रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.