पनवेलमधील माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधून श्री ज्येष्ठराज विनायक गणपती मंदिरातर्फे पाच लाखांची मदत...

पनवेल दि.१५ (वार्ताहर): पनवेलमध्ये माघी गणेशोत्सव उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा होत आहे. पनवेल शहर आणि ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या गणेश मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी लोटली आहे. भक्तिमय वातावरण गणेश मंदिरात आहे. आधी मंदिरापुरता मर्यादित असलेला माघी गणेशोत्सव आता सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पनवेलसारख्या ठिकाणी साजरा होऊ लागला आहे. त्याचप्रमाणे घरगुती स्वरुपातही माघी गणेशोत्सव साजरा होत आहे.
        
पनवेलमधील अनेकांचं श्रद्धास्थान असलेलं ३२५ वर्षांचे पुरातन प्रसिद्ध  "श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक गणपती मंदिरातर्फे पुढील वर्षभर डायलिसिसच्या प्रत्येकी ३ पेशंट्सना आठवड्यातून प्रत्येकी २-२ वेळा मोफत उपचार देण्यासाठी डायलिसिस सेंटर चालविणाऱ्या रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेलला आज रुपये ५ लाख इतक्या देणगीचा चेक आज देण्यात आला. 

यावेळी मंदिराचे अध्यक्ष मुरलीधर जोशी यांसह ट्रस्टी विजय जोशी, जगन्नाथ जोशी, ऍड प्रथमेश सोमण, आनंद काळे, शरद जोशी, श्रीराम वत्सराज तसेच रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेलचे  विलास कोठारी उपस्थित होते.         

फोटोः रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेलला ५ लाखांचा धनादेश देताना मंदिराचे अध्यक्ष मुरलीधर जोशी यांसह ट्रस्टी विजय जोशी, जगन्नाथ जोशी, ऍड प्रथमेश सोमण, आनंद काळे, शरद जोशी, श्रीराम वत्सराज तसेच रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेलचे  विलास कोठारी आदी उपस्थित होते.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image