नागरी सुविधांसाठी नगरसेवक रवींद्र जोशी यांचा पत्रव्यवहार...
नागरी सुविधांसाठी नगरसेवक रवींद्र जोशी यांचे महापौर व आयुक्त यांना निवेदन ...

कामोठे, ता.११( बातमीदार) : भाजप नगरसेवक रवींद्र जोशी यांनी कामोठ्यातील नागरी सुविधांबाबत पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील आणि आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन दिले. या निवेदनाद्वारे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली आहे.

पनवेल सायन महामार्ग  ते मानसरोवर स्थानकापर्यंत वाहनांच्या वर्दळीत वाढ झाली आहे. महानगरपालिकेने या रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. 

मात्र दरवर्षीच्या पावसाळ्यात रस्त्यामध्ये खड्डे पडतात. या खड्ड्यात पाणी साचल्याने  वाहन चालकांना वाहने चालवणे अवघड होते. या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे गरजेचे असल्याचे मत नगरसेवक रवींद्र जोशी यांनी व्यक्त केले  आहे. 

 सेक्टर ३६ भूमी सोसायटी समोरील मार्गावर नागरिकांची सतत वर्दळ सुरू असते. मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक या परिसरात येतात. या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची कमतरता आहे.

 त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या मधुमेहींचे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, महिलांची कुचंबना सुरू आहे. या ठिकाणी महानगरपालिकेने सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करण्याची मागणी करताना के के सिनेमा ते  पेट्रोल पंप पर्यंत नादुरुस्त रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे.

 सेक्टर १७ , १८ , व १२ येथील वीज वाहिन्या भूमिगत करण्याची आणि  सेक्टर १७ व ३६   येथील उद्यानाचे सुशोभीकरण करण्याच्या मागणीचे निवेदन जोशी यांनी महापौर आणि आयुक्तांना दिले आहे.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image