करंजाडे येथे मराठी रंगभूमी दिन कार्यक्रम संपन्न...
करंजाडे येथे मराठी रंगभूमी दिन कार्यक्रम संपन्न...
पनवेल वैभव / दि. ०७ ( संजय कदम ) : करंजाडे येथे मराठी रंगभूमी दिन कार्यक्रम मायबाप प्रेक्षकांच्या साथीने  संपन्न झाला .  
               यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सिने लेखक- दिग्दर्शक ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक केदार शिंदे  यांचे छोटे बंधू मंदार शिंदे ,रेडिओ प्रतिनिधी आकाशवाणी- मुंबईच्या परिणीता सावंत , रंगभूषा-नेपथ्य दिग्दर्शक झी 24 तास- एस्सेल ग्रुप मुंबईचे नंदादीप तांबे,सुप्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर एक उत्तम वक्ते रायगड जिल्हाचे रविकांत भोपी आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी उपस्थित मान्यवरांनी मराठी रंगभूमी दिनानिमित्त आपले विचार प्रगट केले . या कार्यक्रमाचे समन्वय आणि आयोजक महेश लाड हे होते . हा कार्यक्रम  प्रमुख मान्यवर आणि मायबाप प्रेक्षक यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला . 




फोटो - मराठी रंगभूमी दिन कार्यक्रम
Comments