रायगड जिल्हा परिषद शाळा देवळोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा ...
रायगड जिल्हा परिषद शाळा देवळोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा 

पनवेल वैभव / प्रतिनिधी :-  आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय परंपरा आणि प्रचिती देण्यासाठी भारताच्या वतीने जगभरातील १३०० शहरांमध्ये योगाभ्यास व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. आज अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे.

२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. रायगड जिल्हा परिषद शाळा देवळोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी देवळोली ग्रामपंचायतीचे सरपंच राजश्री पाटील, उपसरपंच देवेंद्र पाटील, सदस्य अविनाश गव्हाणकर, सामाजिक कार्यकर्ते राजेश पाटील मरीआई महिला बचतगट अध्यक्ष सौ.भारती पाटील , शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक जगताप सर, जगताप मॅडम, सर्व विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी राजेश सखाराम पाटील आदी उपस्थित होते.
Comments