स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आरोग्य शिबीर...
स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आरोग्य शिबीर...
पनवेल / प्रतिनिधी :- 
प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य व पनवेल उरण आगरी समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरातील ज्योतिबा महात्मा फुले सभागृहात (आगरी समाज हॉल) मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप, दंत चिकित्सा, ईसीजी, मधुमेह, रक्तदाब तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, संघर्ष समितीचे खजिनदार जे. डी.तांडेल, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, सारिका भगत, भाजपचे पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, लायन ग्रुपचे अध्यक्ष बाळू फडके, उपाध्यक्ष रवींद्र शेळके महिला अध्यक्ष माजी नगरसेविका नीता माळी, विजय गायकर, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दिबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव उत्साहात संपन्न ...
Image