एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांचे आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले सांत्वन ....
एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांचे आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले सांत्वन ....

पनवेल / प्रतिनिधी : -
अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेली एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांची उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी आणि पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी न्हावे येथे जाऊन भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. मैथिलीचे वडील मोरेश्वर पाटील हे न्हावे गावचे भाजपचे बूथ अध्यक्ष आहेत. मैथिलीच्या अकाली जाण्याने न्हावे गावासह संपूर्ण पनवेल, उरण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
चार दिवसांपूर्वीच मैथिली ही आजारी असल्यामुळे घरी आली होती. त्यानंतर बुधवारी ती अहमदाबादला जाण्यासाठी निघाली. अपघाताच्या अवघ्या अर्धा तास आधी तिने आई-वडिलांशी फोनवरून संवाद साधून लंडन प्रवासाबद्दल कल्पना दिली होती तसेच लंडनला पोहचल्यावर फोन करते, असे सांगितले. तिचे हे संभाषण अखेरचे ठरले. तिच्या दुर्दैवी मृत्युमुळे दुःख व्यक्त होत आहे.
न्हावे येथे पाटील कुटुबियांच्या सांत्वनपर भेटीवेळी उरणचे आमदार महेश बालदी यांनी, देशावर आलेल्या या संकटात आमच्या परिसरातील कन्यादेखील दुर्दैवाने आम्हाला सोडून निघून गेली, ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. अहमदाबादमध्ये ओळख पटवण्यासाठी मैथिलीचे आई-बाबा पोहचले आहेत. डीएनए मॅच झाल्यानंतर मृतदेह ताब्यात मिळण्याची अपेक्षा आहे. मी स्वतः या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहे. गरज भासल्यास अहमदाबादमध्ये जाण्याच्या तयारीतही आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
आमदार प्रशांत ठाकूर यांनीही आपल्या संवेदना व्यक्त करताना मैथिलीने केलेल्या कामाचा अभिमान वाटत असतानाच काही काळातच तिच्या बाबतीत शोक व्यक्त करण्याची वेळ येणे हे खूप दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. पाटील कुटुंबावर ओढवलेल्या दुखाःतून सावरण्याची ताकद ईश्वर त्यांना देवो, अशी प्रार्थना केली.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image