'आमदार आपल्या दारी' उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत आणि समाधान...
'आमदार आपल्या दारी' उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत आणि समाधान

पनवेल (प्रतिनिधी)तळोजा फेज १ मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार 'आमदार आपल्या दारी' हा उपक्रम रविवारी संपन्न झाला. या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले.
 या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा परिसरातील नागरीकांच्या सर्व समस्या जाणून त्यांचे निराकरण करणार असल्याची ग्वाही दिली. येत्या ३ महिन्यांनतर पुन्हा एकदा या सर्व विषयांवर आढावा घेणार तसेच येत्या १ महिन्यांच्या आत या सर्व समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा सुरु करून नागरीकांना विविध सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे स्पष्ट केले.  त्याचबरोबरीने नागरीकांच्या सुरक्षेचा प्रश्न भाजपचे पदाधिकारी पुढाकार घेऊन सोडवतील असेही त्यांनी नागरिकांना आश्र्वासित केले. 
पनवेल महानगरपालिका आणि शासनाशी संबंधित असलेल्या विविध समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार आपल्या दारी हा उपक्रम करण्यात आला आहे. त्यानुसार तळोजा परिसरातील नागरीकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तळोजा फेज १ सेक्टर ९ मधील उद्यानामध्ये 'आमदार आपल्या दारी' हा कार्यक्रम झाला. यावेळी नागरीकांनी सुरक्षा, पाणी टंचाई, नदी प्रदुषण, डेब्रीज, स्ट्रीट लाइट, बस डेपो, हवा प्रदुषण, क्रिकेट ग्राऊंड, रस्ते, भाजी मार्केट, गार्डन, रस्यांवरील खड्डे, प्रॉपर्टी टॅक्स, साफ सफाई, सबवे मेंटनंस, स्पीड ब्रेकर, पाणी पुरवठा, पब्लीक हेल्थ सेंटर यासह विविध विषय नागरिकांनी मांडले.  या सर्व प्रश्नांचे उत्तर देत लवकरात लवकर या सर्व समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार, तीन महिन्यांनंतर या सर्व प्रश्नांचा पुन्हा एकदा आढावा घेणार असल्याचे सांगीतले. आणि प्रत्येक महिन्यामध्ये एका शहरात आमदार आपल्या दारी हा कार्यक्रम राबवणार तसेच लेखी स्वरुपात ज्यांनी प्रश्न विचारला आहे, त्यांना १० दिवसांमध्ये उत्तर देणार असल्याची माहिती दिली. एकूणच नागरिकांच्या समस्या आणि सूचनांचा विचार करून त्यांना योग्य ते सहकार्य आणि त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. त्यामुळे या उपक्रमाचा नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले. 
या कार्यक्रमावेळी वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, माजी नगरसेवक हरेश केणी, पापा पटेल, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, निर्दोश केणी, संतोष पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, महिला मोर्चाच्या आशा बोसरे, ऍड. चेतन जाधव,  यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image