बाळाराम पाटील यांना विजयी करण्याचे प्रकल्पग्रस्त शेतकरी नामदेव गोंधळी यांचे पनवेलकरांना आवाहन
बाळाराम पाटील यांना विजयी करण्याचे प्रकल्पग्रस्त शेतकरी नामदेव गोंधळी यांचे पनवेलकरांना आवाहन

पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः पनवेल विधानसभा मतदार संघाचे शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन प्रकल्प्रस्त शेतकरी व न्यायालयीन लढा देण्यात प्रसिद्ध असलेले असे नामदेव गोंधळी यांनी पनवेलकरांना केले आहे.
जमिनीच्या व्यवहारातील फसवणुकीसंदर्भात गेल्या अनेक वर्षापासून नामदेव गोंधळी हे शेतकरी शासनाविरोधात लढा देत आहेत व या लढ्याला आता यश मिळू लागले आहे. गेली अनेक वर्षे त्यांनी या संदर्भात पनवेल तालुक्यासह अलिबाग येथे सुद्धा 11 पत्रकार परिषद घेवून शासनाविरोधात आवाज उठविला आहे. या लढ्यामध्ये त्यांना प्रामुख्याने शेकाप नेते बाळाराम पाटील व जी.आर.पाटील यांची साथ व मार्गदर्शन लाभले आहे. आज नामदेव गोंधळी यांच्या लढ्याला यश येत असले तरी त्यांना साथ देणारे बाळाराम पाटील यांना ते विसरले नसून त्यांचा प्रचार ते तनमनधनाने करीत आहेत व या निवडणुकीत शेतकरी बांधवांनी बाळाराम पाटील यांनाच मतदान करावे, शिट्टी समोरील बटण दाबावे असे आवाहन आपली 11 वी पत्रकार परिषदेत घेताना पत्रकार बांधवांच्या माध्यमातून केले आहे.


फोटो ः नामदेव गोंधळी
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image