सर्व समाज बांधवाना न्याय - माजी सभागृहनेते परेश ठाकूर ..
सर्व समाज बांधवाना न्याय - माजी सभागृहनेते परेश ठाकूर 
पनवेल (प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर यांनी कधीही धर्मभेद न करता सर्व समाज बांधवांना न्याय देण्याचे काम केले आहे.  त्यामुळे आता सर्वांनी एकत्रित येऊन होऊ घातलेल्या निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले.  
         पनवेल कोळीवाड्यातील कोळेश्वर विद्यामंदिर शाळेसमोर त्यांचे प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, उद्योजक इकबाल काझी, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, मुकीद काझी, पापा पटेल, भाजप शहर उपाध्यक्ष अमित ओझे, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अमन अख्तर, प्रितम म्हात्रे, जवाद काझी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
         आमदार प्रशांत ठाकूर हे सामाजिक कार्याला महत्व देतात. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला ते सहकार्य करतात. सामाजिक कार्यात कधीही राजकारण आणत नाहीत. प्रत्येक समाजातील लोकांच्या सुख दुःखात ते असतात. पनवेलच्या विकासासाठी त्यांनी नेहमी सकारात्मक ऊर्जेने काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी सर्व समाजातील आणि तळागाळातील लोकं पाठीशी आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही आमदार प्रशांत ठाकूर यांना निवडून देत पनवेलच्या विकासाला मत देणार असून यापुढेही अधिक जोमाने काम करण्यासाठी तुमची ताकद प्रशांतदादांना द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image