खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटलच्या डॅाक्टरांनी केली पेनाईल इम्प्लांट शस्त्रक्रिया..
पनवेल वैभव / नवी मुंबई : -
इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या असलेल्या 55 वर्षीय युएई रुग्णावर नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये पेनाईल इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आलेली. मेडिकवर हॉस्पिटलचे यूरोलॉजिस्ट डॉ. विकास भिसे यांच्या नेतृत्वाखालील टिमने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
जिनेश पटेल (नाव बदलले आहे) हे इरेक्टाइल डिसफंक्शनच्या समस्येने त्रस्त होते. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाला पेनाईल इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.
नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलचे यूरोलॉजिस्ट डॉ विकास भिसे सांगतात की , रुग्ण इरेक्टाइल डिसफंक्शन (ईडी)समस्येने ग्रासला होता. इरेक्टाइल डिसफंक्शन हा एक पेनाईल डिसऑर्डर आहे शारीरिक संबंधादरम्यान यात एकतर इरेक्शन न होणे, ताठरता नसणे, काही लोक इरेक्शन कायम ठेवू न शकणे, काही सेकंदातच त्यांचं इरेक्शन होणे अशी लक्षणे दिसून येतात. मधुमेह आणि उच्च रक्तदाब वाढल्यामुळे ही समस्या उद्भवते. लिंगास झालेली दुखापत हे देखील याचे एक कारण आहे. वेळीच निदान आणि उपचार केल्यास ही समस्या दूर होऊ शकते. सुरुवातीला औषधे न देता प्लाझ्मा शॉट इंजेक्शन दिली जातात. जर काही सुधारणा होत नसेल तर पेनाइल इम्प्लांट शस्त्रक्रियेची शिफारस केली जाते. इम्प्लांटची निवड रुग्णाकडून त्याच्या गरजेनुसार केली जाते. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण दुसऱ्याच दिवशी घरी जाऊ शकतो.
डॉ. भिसे पुढे सांगतात की, इरेक्टाइल डिसफंक्शन एक आव्हानात्मक स्थिती आहे. जेव्हा इतर उपचार कार्य करत नाहीत, तेव्हा ही इम्प्लांट शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. यामध्ये अंडकोषात इंम्प्लांट केले जाते. ही शस्त्रक्रिया सामान्यत: स्पाइनल ऍनेस्थेसिया अंतर्गत केली जाते आणि शस्त्रक्रियेला साधारणतः एक ते दोन तास लागतात आणि ही अगदी सुरक्षित आहे.
डॉ. भिसे पुढे सांगतात की, रुग्णांना उपचारासाठी जवळपास 6 आठवडे लैंगिक क्रियेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. पुरुषाच्या जननेंद्रियाचे रोपण हे अत्यंत प्रभावी आहे, विशेषत: जेव्हा इतर उपचार जसे की औषधे किंवा इंजेक्शन्स काम करत नाहीत. अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. कधीकधी, पुनर्प्राप्तीसाठी आणि लैंगीक कार्य सुधारण्यासाठी पेल्विक फ्लोर व्यायामाची शिफारस केली जाऊ शकते. परंतु हा व्यायाम सुरू करण्यापूर्वी यूरोलॉजिस्टचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
रुग्ण जिनेश पटेल (नाव बदलले आहे) म्हणाले, मी इरेक्टाइल डिसफंक्शनमुळे खूप चिंताग्रस्त झालो होतो. लैंगिक क्रियांमध्ये सहभागी होता न आल्यामुळे माझ्या वैवाहीक जीवनात अडचणी येत होत्या. मला तणाव आणि नैराश्याचा सामना करावा लागत होता. एकटेपणाने मला घेरले होते. या आजारामुळे मला खूप लाज वाटायची. पण मेडिकवर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तातडीने उपचार केल्यामुळे मला आयुष्य जगण्याची दुसरी संधी मिळाली. यासाठी मी डॉक्टरांच्या संपुर्ण टिमचे आभार मानतो.