स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली महाड येथे "स्वाभिमानी मेळावा"
 महाड येथे "स्वाभिमानी मेळावा" चे आयोजन..

पनवेल वैभव / प्रतिनिधी : -
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांचा "स्वाभिमानी मेळावा " सोमवार दि. 16 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी दोन वाजता संपन्न होणार आहे . 

या मेळाव्याचे आयोजन महाड तालुका अध्यक्ष सुजित जाधव व महाड शहराध्यक्ष सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या मेळाव्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर भाई संसारे , महाराष्ट्र प्रदेशचे युवा नेते अनिकेत संसारे, महासचिव अशोकजी वाघमारे, अरुण धीवर, मुंबई प्रदेशचे अध्यक्ष अमित हिरवे, विजय पवार, सिद्धार्थ पेडणेकर, व महाराष्ट्राचे संघटक भगवान गरुड  उपस्थित राहणार आहेत. 

सदर मेळावा जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या संकल्पनेतून घेण्यात येत आहे . या मेळाव्यासाठी रायगड जिल्हा कार्याध्यक्ष विजय धोत्रे त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे अध्यक्ष , शहरांचे अध्यक्ष व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.  रायगड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना महेश साळुंखे यांनी आवाहन केले आहे की त्यांनी या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे . 
सदर मेळावा सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी दोन वाजता  भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन चवदार तळे महाड येथे संपन्न होणार आहे.
Comments
Popular posts
तळोजा येथील 'द एलिट पब्लिक स्कूल' मधील विद्यार्थ्याचे बॉक्सिंग स्पर्धेत सुयश...
Image
पनवेल सीकेपी समाजाच्या कृष्ण जन्माष्टमी सोहळ्याची शतकोत्तर वाटचाल ; दोन दिवसीय पारंपारिक कृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात संपन्न
Image
गुन्हे शाखा कक्ष ३ पनवेल वपोनिपदी औदुंबर पाटील तर पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी सुभाष पुजारी..
Image
जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि MHFDA पनवेलच्या ‘नवदृष्टी’ उपक्रमातून शिक्षकांना सर्वांगीण आरोग्याचे मार्गदर्शन..
Image
खारघर मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार ; गर्भवती महिलेच्या पित्तनलिकेतून काढले १५ मोठे खडे...
Image